Ratnagiri Water Scarcity | रत्नागिरीत पाणीबाणी! 34 हजार नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा, 17 टँकरद्वारे पुरवठा सुरू

Ratnagiri Water Scarcity | पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रशासनाला कडक आदेश; रत्नागिरीतील पाणीटंचाईचे योग्य नियोजन करा
Water Scarcity
Water ScarcityPudhari
Published on
Updated on

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

एप्रिल महिना संपला असून मे महिना सुरू झालेला आहे. दिवसेंदिवस पाण्याची दाहकता वाढत चालली आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात 34 हजार 295 लोकांना 17 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

Water Scarcity
Child Mortality Control | बालमृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्य आणि जिल्हा स्तरावर 'लसीकरण कृती दल' स्थापन

लांजा, गुहागर आणि राजापूर या तीन तालुक्यांत अद्याप ही एकही टैंकर सुरू नाही. मे महिन्यात पाण्याची टंचाई आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. मे महिना सुरू झाला असून जिल्ह्यातील नद्या, धरणातील पाणी दिवसेंदिवस आटत चालले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

जलजीवनचे काम होऊन ही कित्येक ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. 9 तालुक्यापैकी 6 तालुक्यांत 17 टँकरने पाणपुरवठा सुरू झाला आहे. 43 गावांतील 99 वाड्यांत 3 शासकीय आणि 14 खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

एकूण 170 फेऱ्या होत आहेत. सर्वाधिक पाणी टंचाई रत्नागिरी, मंडणगड, चिपळूण, खेड तालुक्यात भासत आहे. या महिन्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीटंचाई गांभिर्याने घ्या, योग्य नियोजन करा, असे आदेश ही पालकमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेऊन दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news