Ratnagiri Rain Update : वळवाचा महावितरणला ८० लाखांचा फटका

जिल्ह्यात ३४० हून अधिक वीज पोल कोसळले; युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू
Ratnagiri Rain Update
वळवाचा महावितरणला ८० लाखांचा फटका
Published on
Updated on

चिपळूण : अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये महावितरणच्या वीज यंत्रणेला मोठा फटका बसला असून सुमारे ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. रत्नागिरी, लांजा, चिपळूण, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा सर्वाधिक परिणाम जाणवला. महावितरणचे उच्चदाब वाहिनीचे सुमारे १०८ पोल तर लघुदाब वाहिनीचे सुमारे २३५ पोल कोसळले. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्याने विद्युत पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता.

वळवाच्या पावसामुळे जिल्हाभरातील वीज यंत्रणेला मोठे नुकसान सहन करावे लागले. वादळी वाऱ्यामुळे साडेतीनशेहून अधिक वीज पोल जमीनदोस्त झाल्याने अनेक गावांतील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दुरुस्ती कामाला लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news