Ratnagiri News| बेशुध्दावस्थेत सापडलेल्या नेपाळी खलाशाचा मृत्‍यू

मिरकरवाडा येथील घटना
Ratnagiri News
बेशुध्दावस्थेत सापडलेल्या नेपाळी खलाशाचा मृत्‍यूFile Photo
Published on: 
Updated on: 

रत्‍नागिरी : मिरकरवाडा येथे बेशुध्द अवस्थेत सापडून आलेल्या नेपाळी खलाशाचा मृत्‍यू झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना शनिवार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वा. च्‍या सुमारास उघडकीस आली. ईश्वर रामकृष्ण चौधरी (२०, रा. मूळ रा. कैलाली, नेपाळ सध्या रा. मिरकरवाडा जेटी, रत्‍नागिरी) असे आकस्मिक मृत्‍यू झालेल्या नेपाळी खलाशाचे नाव आहे.

याबाबत भरत खुशीराम चौधरी याने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्‍यानुसार, शनिवारी सायंकाळी ईश्वर चौधरी हा मिरकरवाडा जेटी येथे बेशुध्द स्थितीत सापडल्यावर भरत चौधरी व इतर खलाशांनी त्‍याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ईश्वरला तपासून मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news