रत्नागिरी: चिपळूणमध्ये तीन अपघातांत दोघांचा मृत्यू

Road Accident: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील घटना; तिघे गंभीर जखमी
Road Accidents in Chiplun
चिपळूण शहर : चिपळूण शहर : परशुराम घाटात आयशर ट्रकमधून मच्छीचे क्रेट असे पसरले.pudhari photo
Published on
Updated on

चिपळूण शहर : शहर परिसरात परशुराम ते कामथे घाटदरम्यान महामार्गावर झालेल्या तीन अपघातांमध्ये दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघात मालिकांमध्ये सर्व वाहनांचे मिळून लाखोंचे नुकसान झाले आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय परशुराम घाटातील अवघड वळण उतारावर एक माशांचा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरच उलटला तर शहरातील पॉवर हाऊस स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात एस.टी.च्या पुढील चाकाखाली दुचाकीवरून जाणारे तीन स्वार अडकून गंभीर जखमी झाले. कामथे घाटात दुचाकीवरून जाणार्‍या दोन स्वारांचा लोखंडी दुभाजकावर धडकून जागीच मृत्यू झाला. नांदेड येथील उदय किरण आटपालकर (वय 21) व साहील राजेंद्र सुर्वे (वय 22) अशी ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.

दरम्यान, कामथेतील अपघातात दुचाकीचे दोन तुकडे झाले. अशा घटना घडल्याने अपघाताच्या मालिकांनी चिपळुणात नववर्षाचे पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडल्या. गतवर्षीपासून चिपळुणात कामथे ते परशुराम घाटादरम्यानच्या महामार्गावर अनेक छोटे-मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये परशुराम घाट, शहरातील स्वा. सावरकर चौक व कामथे घाट परिसर अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे.

परशुराम घाटात मंगळवारी मध्यरात्रीनंतर उरण येथून रत्नागिरीकडे मासे घेऊन जाणार्‍या ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने उलटला. यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले तर ट्रकमधील मच्छी महामार्गावर रस्त्यावर पसरली.

शहरातील पॉवर हाऊस अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात एस.टी. बस स्थानकाकडे येत असताना एका दुचाकीवरून तिघे स्वार प्रवास करीत असताना बसच्या पुढील चाकात सापडले. यामध्ये तिघे जखमी झाले असून यातील दोघे गंभीर जखमी झाले. कामथे घाटात दुचाकीवरून जाणार्‍या दोन तरुणांची दुभाजकाला जोरदार धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

दरम्यान, कामथे येथे महामार्गावरील दुभाजकावर धडकून झालेल्या दुचाकी अपघातात गाडीचे दोन तुकडे झाले. या दुचाकीवरून प्रवास करणारे दोन्ही तरूण जागीच ठार झाले. डेरवण वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकणारा नांदेड येथील उदय किरण आटपालकर व साहील राजेंद्र सुर्वे असे ठार झालेल्यांची नावे आहेत. साहीलची आई डेरवण रुग्णालयात कर्मचारी आहे. डेरवणहून ते चिपळूणकडे येत होते.

तिसर्‍या अपघातात चिपळूण शहरातील पाग पॉवर हाऊस येथील अपघातात कोल्हापूर-रोहा एस.टी. बस चालक अनिल गोपीनाथ भोसले हे चिपळूण बसस्थानकाकडे बस घेऊन येत असताना दुचाकी घेऊन पंजाबी ढाब्याकडे जाणारे सौरभ नरळकर (वय 19), सिद्धेश काणेकर (रा. पेढे) आणि शुभम काणेकर (रा. पेढे) हे तिघे जात होते. यावेळी पॉवर हाऊस येथे आले असता बसखाली दुचाकी जाऊन अपघात झाला. या अपघात हे तिघेही गंभीर जखमी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news