

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ व रत्नागिरी जिल्हा समन्वय समिती यांच्या माध्यमातून शाळा बंद आंदोलन व नवीन संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्याबाबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. शिक्षक वर्गाकडून याला मोठा प्रतिसाद मिळाला.
जिल्ह्यातील काही अपवाद वगळता सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अनुदानित, विनाअनुदानित स्वयंअर्थसहित शाळा या सर्व विभागातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मोठ्या संख्येने जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विराट मोर्चासाठी रत्नागिरी येथे दाखल झाले होते. सुमारे 13 विविध संघटनांनी तसेच सुमारे 1300 कर्मचार्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला. प्रथमतः जिल्हा परिषद रत्नागिरी कार्यालयाजवळ जिल्ह्यातून आलेले सर्व कर्मचारी एकत्रित झाले. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मुख्य रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला. सुरुवातीला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे कोषाध्यक्ष संदेश राऊत यांनी मोर्चा काढण्याची वेळ का आली याची माहिती सर्व उपस्थितांना करून दिली.
15 मार्च 2024 चा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, अशा महत्त्वाच्या मागण्या डोळ्यासमोर ठेवून? हे आंदोलन पुकारल्याचे संदेश राऊत यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष व समन्वय समितीचे अध्यक्ष आयुब मुल्ला यांनी आपल्या न्याय हक्काच्या लढाईला सुरुवात झाल्याचे स्पष्ट केले.रत्नागिरी जिल्हा अधिकारी यांना? ? संपूर्ण जिल्ह्याच्यावतीने निवेदन देण्यात आले. त्यावेळेस एम. देवेंद्र सिंह यांनी आपण दिलेले निवेदन शासनाकडे पोहोच केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी संपात सहभागी झालेल्या विविध संघटनांचे अध्यक्ष मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष सचिव सदस्य आदी उपस्थित होते.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी? ? मुख्याध्यापक महामंडळाचे सहसंपादक रमेश तरवडेकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव महेश पाटकर, अध्यापक संघाचे जिल्हा सचिव रोहित जाधव, संजू वाघमारे,कल्पेश दळवी, संतोष हजारे, मंगेश गोरिवले,? ? प्रशांत खेडेकर, सुनील घाणेकर,विलासराव कोळेकर, श्रीशैल्य पुजारी, अरुण जाधव, रामचंद्र कापसे, रामचंद्र केळकर, अनंत साठे, अनंत साळवी, संदेश कांबळे,राजाराम गर्दे आदी मान्यवरांनी विशेष प्रयत्न केले.
समन्वय समितीचे सचिव सागर पाटील यांनी देखील मोर्चाला संबोधित करीत असताना एकजुटीची गरज स्पष्ट केली. रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष संजय चव्हाण यांनी ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्यासाठी आलेला शासन निर्णय तत्काळ रद्द करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.