

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ पुरुष व महिला तायक्वांदो स्पर्धा-२०२४-२५ वैयक्तिक स्पर्धेत १ सुवर्णपदक आणि ३ कांस्यपदक पटकावले तर महिला तायक्वांदो स्पर्धेत सर्वसाधारण उपविजेतपद प्राप्त केले. (Taekwondo)
मुंबई विद्यापीठ, मुंबई आणि जी. एन. खालसा महाविद्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ ते ११ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई विद्यापीठ पुरुष व महिला तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ वैयक्तीक पुरुष व महिला तायक्वांदो स्पर्धेत अनुक्रमे महिलांमध्ये श्रुती रामचंद्र चव्हाण ४६ किलो ग्रॅम वजनी गट- सुवर्ण पदक, सई संदेश सावंत ७३ किलो ग्रॅम वजनी गट कांस्यपदक, समर्धा सतीश वाणे- ४९ किलो. ग्रॅम वजनी गट कांस्य पदक तर पुरुष गटात कु. वेदांत सूरज चव्हाण ५४ किलो ग्रॅम वजनी गट कांस्यपदक प्राप्त केले. तसेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चे महिला स्पर्धेचे सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील पदक प्राप्त विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, प्रशिक्षक शाहरुख निसार शेख यांचे मार्गदर्शन आणि रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सहकार्या लाभले. मुंबई विद्यापीठ पुरुष व महिला वैयक्तिक Taekwondo स्पर्धेत पदक प्राप्त तसेच महिला स्पर्धेचे सर्वसाधारण उपविजेतेपद प्राप्त विद्यार्थ्यांना र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर संस्थेचे सर्व सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेशबोटके सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.