Ratnagiri Crime : रेल्वे स्टेशन परिसरात संशयित इसमाला अटक

पोलिसांची कारवाई; ₹५५५ किमतीचा मुद्देमाल ताब्यात
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

राजापूर : राजापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेरील बाजूस बंद हॉटेलजवळ रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या ५५ वर्षीय इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील ट्रॉली बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात जुने वापरते महिलांचे कपडे आढळून आले. या साहित्याबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत कारवाई केली.

सुधीर श्रीधर पोटले (वय ५५, रा. जांभवली पहिली वाडी, ता. राजापूर) असे कारवाई करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास राजापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेरील बाजूस बंद हॉटेलच्या शेजारी सुधीर पोटले हा काळ्या रंगाची ट्रॉली बॅग घेऊन संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. स्टेशन परिसरात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी ट्रॉली बॅगेतील साहित्याबाबत त्याने समाधानकारक माहिती दिली नाही. संशय बळावल्याने पोलिसांनी बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारचे जुने वापरते महिलांचे कपडे, अंतर्वस्त्रे, टॉप, पायजमे, जिन्स पॅन्ट, टी-शर्ट आदी साहित्य आढळून आले. या साहित्याच्या मालकीबाबत किंवा ते त्याच्याकडे कसे आले, याबाबत समाधानकारक खुलासा आरोपीकडून करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी ५५५ रूपये किमतीचे महिलांचे कपडे २०० रुपये किमतीची व्हीआयपी कंपनीची ट्रॉली बॅग, असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत रेल्वे स्टेशन परिसरात कर्तव्यावर असलेल्या पोलिस व होमगार्डच्या पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news