

रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था नासा आणि इस्त्रो भेट उपक्रमासाठी 2025-26 या वर्षाची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.
नासा आणि इस्त्रो भेटीसाठी तालुकावार निवड झालेले विद्यार्थी मंडणगड : शार्दुल पणदिरकर, कोन्हवली शाळा (इस्त्रा), रुंजी जाधव, वाल्मिकीनगर शाळा (इस्त्रो), श्रेया चिंचघरकर, चिंचघर शाळा (इस्त्रो), अपेक्षा बोत्रे, गोठे नंबर एक शाळा (नासा आणि इस्त्रो) आणि मानस जाधव, बाणकोट मराठी शाळा (नासा आणि इस्त्रो) यांचा समावेश आहे.
दापोली : आरोही मुलुख, चंद्रनगर शाळा (नासा), निरजा वेदक, चंद्रनगर शाळा (नासा आणि इस्त्रो), दिक्षा येसवारे, किन्हळ शाळा (इस्त्रो), अक्षरा पाटील, विरसई शाळा (इस्त्रो), प्राजल खळे, नवशी शाळा (इस्त्रो) आणि सृष्टी कोठावळे, हर्णे नं. 2 शाळा (इस्त्रो) या 6 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
खेड : स्वरा मर्चंडे, जांबुर्डे मोरवंडे शाळा ( नासा आणि इस्त्रो), शुभ्रा मोरे, आंबडस नं.1 शाळा (नासा आणि इस्त्रो), आरोही महाडिक, तिसे शिगवण शाळा (इस्त्रो), अनुज मोहिते, हेदली नं.1 शाळा (इस्त्रो) कबीर धस, वावे तर्फे खेड शाळा (इस्त्रो)आणि उन्नती पवार, उधळे बुद्रुक शाळा (इस्त्रो) या 6 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
चिपळूण : ऋग्वेद मुळे, बोरगाव नं.1 शाळा (इस्त्रो), अनघा तांबेकर, पालवण नं.1 शाळा (नासा), यश खांबे, कान्हे मराठी शाळा (नासा व इस्त्रो), रिती मोरे, दोनवली शिर्के शाळा ( इस्त्रो), आयुष पुजारी, पेढांबे नं.1 शाळा (इस्त्रो), धनश्री भुवड, कोसबी नं.1 शाळा (इस्त्रो) आणि रेणुका इरले, पाग मुलीं शाळा (इस्त्रो) 7 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
गुहागर : अर्णव बामणे, कौंढर काळसूर गुरववाडी शाळा (नासा व इस्त्रो), यश राठोड, जि.प. शाळा गुहागर नं.1 (इस्त्रा), शुभ्रा भाटकर, जि.प. शाळा शीर नं.1 (नासा व इस्त्रो), अनय कानडे, जि.प. शाळा गुहागर नं.1 (इस्त्रो) आणि राहूल आंबेकर, कर्दे नं.2 शाळा (इस्त्रो) या 5 विद्यार्थ्यांनी आपली निवड निश्चित केली आहे.
संगमेश्वर : आयशा खान, पद्मा कन्या शाळा साखरपा (नासा व इस्त्रो), संस्कृती तरंगे, पद्मा कन्या शाळा साखरपा (नासा व इस्त्रो), अथर्व गुरव, देवरुख नं. 4 शाळा (नासा व इस्त्रो), स्वरांगी कांबळे, चाफवली नं.1 (इस्त्रो), स्वरूप पाटील, देवाख नं.4 शाळा (इस्त्रो) आणि सोहम पाकतेकर, डिंगणी खाडेवाडी शाळा ( इस्त्रो), या 6 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
रत्नागिरी : ऋणाली पाटील, शाळा निवेंडी वरी (नासा व इस्त्रो), आर्या शिगवण, शाळा निवेंडी वरी (नासा व इस्त्रो), आरोही शिंदे, साठरे नं.2 (इस्त्रो), तिर्था चव्हाण, पानवल होरंबेवाडी (इस्त्रो), मनवा मुळये, पानवल होरंबेवाडी (इस्त्रो),आणि इशा घाणेकर, देऊड गावातील वाडी शाळा (इस्त्रो), या 6 विद्यार्थिनींची निवड झाली आहे.
लांजा : पियुष सरक, जि. प. पू. प्रा. शाळा र्हो नं. 1 (नासा व इस्त्रो), विधी धुर्ये, जि. प. शाळा शिरवली (नासा व इस्त्रो), राजकुवर किल्लेदार, (इस्त्रो), हार्दिक कोपरे, जि.प.शाळा लांजा नं. 5 (इस्त्रो), आणि सार्थक गितये, जि. प. पू. प्रा. शाळा भडे नं.1 (इस्त्रो). या 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
- राजापूर : शिवसमर्थ मुंडे, विश्वनाथ विद्यालय राजापूर नं.1 (नासा), स्वरांग भोसले, जि. प. पू. प्रा. शाळा गोखले कन्याशाळा (नासा), ओवी पवार, विश्वनाथ विद्यालय राजापूर नं. 1 (नासा व इस्त्रो), आराध्य देसाई, विश्वनाथ विद्यालय राजापूर नं.1 शाळा (इस्त्रो), ईश्वरी चव्हाण, विश्वनाथ विद्यालय राजापूर नं. 1 (इस्त्रो), मेघा जानस्कर, जि. प. पू. प्रा. शाळा कोतापूर नं.1 (इस्त्रो), स्वरा भोसले, विश्वनाथ विद्यालय राजापूर नं. 1 (इस्त्रो) आणि वेद परवडे विश्वनाथ विद्यालय राजापूर नं. 1 शाळा (इस्त्रो) अशा 8 विद्यार्थ्यांची सर्वाधिक निवड या तालुक्यातून झाली आहे.