रत्नागिरी : वादळी स्थितीमुळे पर्ससीन नेट मासेमारीचा मुहूर्त हुकला

जिल्ह्यात जवळपास 280 पर्ससीन नेटधारक नौकांचा समावेश
Perscene net fishing
समुद्रातील वादळी वार्‍यामुळे पर्ससीन नेट मासेमारीचा मुहूर्त हुकला आहे.
Published on
Updated on

रत्नागिरी : समुद्रातील वादळी वार्‍यामुळे पर्ससीन नेट मासेमारीचा मुहूर्त हुकला. रविवारी पर्ससीन नेट मासेमारीसाठी नौका समुद्रात नेण्याची पूर्ण तयारी झाली होती. परंतु मासेमारीच्या पहिल्याच दिवशी बहुसंख्य नौका मिरकरवाडा बंदरात उभ्या होत्या.

Perscene net fishing
Thane | पर्सेसिन नेट, एलईडी मासेमारी मत्स्य विभागाच्या रडारवर

जून महिन्यापासून पावसाळी मासेमारी बंदी सुरू झाली होती. पावसाळी मासेमारी बंदी दि. 1 ऑगस्टपासून उठल्यानंतर पारंपरिक मासेमारी सुरू झाली. दरवर्षी 1 सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू होते. पर्ससीन नेट मासेमारी नौकांची, जाळ्यांची आवश्यक असणारी दुरूस्ती पूर्ण करून घेण्यात आली. खलाशी, तांडेलना पर्ससीन नेट नौका मालकांनी आणले आहे. परंतु पहिल्याच दिवशी पर्ससीन नेट मासेमारीचा मुहूर्त समुद्रातील वादळी वार्‍यामुळे साधता आलेला नाही.

रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 280 पर्ससीन नेट नौका आहेत. गेल्यावर्षीच्या मोसमात मासळी मिळण्याचा रिपोर्ट संमिश्र होता. अनेक नौका मालकांना कमी मासळी मिळाल्याने नुकसान सोसावे लागले. या पार्श्वभूमीवर नव्याने सुरू होणार्‍या हंगामात हे नुकसान भरून काढण्याच्या तयारीत असणार्‍या नौका मालकांचा हिरमोड झाला आहे. समुद्रातील वारे आणि उंच लाटांमुळे पहिल्याच दिवशी नौका समुद्रात मासेमारीसाठी पाठवता आलेल्या नाहीत.

Perscene net fishing
पाकिस्तानी सागरी सुरक्षा दलाने भारतीय मासेमारी नौकेवर बेछूट गोळीबार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news