Ratnagiri storm damage houses repair |वादळात उद्ध्वस्त घराची २४ तासांत दुरुस्ती !

डेरवणमधील जंगम कुटुंबीयांसाठी भाजप नेते प्रशांत यादव ठरले आधारस्तंभ
Ratnagiri storm damage houses repair
चिपळूण : तालुक्यातील डेरवण गवळवाडी येथे वादळात उद्ध्वस्त झालेले घर. दुसऱ्या छायाचित्रात अवघ्या चोवीस तासात दुरुस्तीनंतर सावरलेले घर.
Published on
Updated on

चिपळूण शहर : घोंगावत आलेल्या वादळाने एका गरीब शेतकऱ्याच्या घराला लक्ष्य केले. अवघे घर उद्ध्वस्त झाले. शेतकरी कुटुंबावर जणू आभाळ कोसळले. पण देवाच्या रुपात भाजप नेते प्रशांत यादव मदतीला धावले आणि अवघ्या २४ तासांत त्या घराची दुरुस्ती करून त्या गरीब कुटुंबाचा संसार आनंदाने सुरू करून दिला.

या गरीब कुटुंबातील तरुण ओंकार जंगम हा प्रशांत यादव यांच्या कार्यालयात कर्मचारी म्हणून सेवा देत आहे. एका कर्मचाऱ्याप्रती दाखवलेली ही संवेदनशीलता चर्चेचा विषय बनली आहे. चिपळूण तालुक्यातील डेरवण गवळवाडी येथे २३ एप्रिल रोजी घराचे नुकसान झाल्याचा दूरध्वनी ओंकारला आला, यावेळी तो कामावर होता. यानंतर तातडीने त्याने डेरवणकडे धाव घेतली, गवळवाडी येथील आपल्या घरासमोर पोहचताच समोर दृश्य पाहून तो अक्षरशः कोसळला. घराच्या फक्त भिंती उभ्या होत्या. त्यालाही तडा गेला होता, छप्पर तर नाबालाही नव्हते. संसाराची नासधूस झाली होती.

Ratnagiri storm damage houses repair
Ratnagiri Bhatye- भाट्ये खाडी मुखाजवळ उभारणार बंधारा

काही महिन्यांपूर्वी बांधलेल्या घराची झालेली ही अवस्था ओंकार आणि त्याच्या कुटुंबाला भोवळ आणणारी ठरली होती; परंतु गरिबाच्या मागे देव उभा असतो असे म्हणतात तेच खरे ठरले. ओंकार जंगमने तत्काळ प्रशांत यादव यांचे स्वीय सहाय्यक गुलजार गोलंदाज यांच्याकडे संपर्क साधला. गोलंदाज यांनी क्षणाचाही विलंब न लावता भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांना बरोबर घेऊन डेरवण गवळवाडी येथे धाव घेतली. पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रशांत यादव यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण वस्तुस्थिती कथन केली. यानंतर प्रशांत यादव यांनी क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ बराची दुरुस्ती सुरू करा असे जणू आदेशच दिले.

इतकेच नव्हे तर कार्यालयातील अभियंता शशांक मोहिते यांच्यासह पिंपळीचे माजी सरपंच दादा देवरुखकर यांची टीम थेट घटनास्थळी रवाना केली आणि घर दुरूस्तीच्या कामाला सुरुवात झाली. प्रशांत यादव कुटुंबासह बाहेरगावी असतानादेखील सर्व यंत्रणा कामाला लावली आणि अवघ्या २४ तासांत ओंकार जंगम याचे घर होते तसे करून दिले.

Ratnagiri storm damage houses repair
Ratnagiri Water Crisis | जिल्ह्यातील पाणी टंचाईची दाहकता वाढली

यादव साहेबांच्या रुपात देवच पावला :

जंगम काळाने इझडप घातली होती, पण देवाच्या रुपात प्रशांत यादव साहेब धावले आणि आम्ही सावरलो, अशी भावनिक प्रतिक्रिया यावेळी ऑकार व त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news