

रत्नागिरी : एसटी विभाग डिजिटलकरणाच्या दिशेने जात आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवास करताय आणि तुमच्या खिशात पैसे नाही अथवा सुट्टे पैसे नाही तर काळजी करू नका आता मशीनवर क्यूआरकोडवर स्कॅन करून तुम्ही ऑनलाईन युपीआय पेमेंटने तिकीट काढू शकता. मागील दोन वर्षात जिल्ह्यासह राज्यात युपीआय पेमेंटला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एसटी महामंडळ प्रवाशांना सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्न करत असते. तिकीट बुकींग करण्यासाठी विविध अॅप, एसटीचे लोकेशन बघण्यासाठी अॅपनंतर एसटी विभागाने तिकीटच्या मशीनमध्ये एक कोड ठेवला असून त्यानुसार प्रवाशांना आता युपीआय पेमेंटने तिकीट काढता येणार आहे. प्रवासाला निघाल्यावर तिकीट काढताना बर्याच वेळा सुटया पैशांची समस्या उदभवते. वाहक व प्रवाशांमध्ये बर्या वेळा वाद होतो. कारण आता एसटीमध्ये प्रवास करताना सुट्या पैशांची चिंता मिटली आहे. प्रवासी आता युपीआयने तिकीट काढत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यतील स्मार्ट प्रवासी विशेषत: महाविद्यालयीन तरूण, तरूणी, नोकरदारवर्ग मंडळी नेहमीच युपीआय पेमेंटचा आधार घेत आहेत. याला चांंगला प्रतिसाद मिळत आहे. जर सर्व्हर डाऊन असल्यास किंवा तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्यास पेमेंट होत नाही. बर्याच वेळा असे घडले आहे. जोपर्यंत पेमेंट सक्सेसफुल्ल होत नाही तोपर्यंत तिकीट येत नाही. एसटी महामंडळातर्फे युपीआय पेमेंटचा पर्याय प्रवाशांना ठेवल्यामुळे चुकून पाकिट विसरले किंवा खिशात पैसे नाहीत किंवा ज्यांना रोख ऐवजी ऑनलाईन पेमेंट करायची आहे त्यांनी आता काळजी करू नये मशीनद्वारे कोड स्कॅन करून आपण पेमेंट करून तिकीट घेवू शकता.
एखाद्यावेळी युपीआयने पेमेंट झाल्यानंतर मशीनला दाखवत नसेल आणि तुमचे पैसे खात्यातून कट झाले असतील तर काळजी करू नका ते पैसे पुढच्या 24 किंवा 48 तासाच्या आत परत तुमच्या खात्यावर येणार. सर्व्हर डाऊन किंवा नेटवर्कच्या इश्यूमुळे अशा घटना घडत असल्यामुळे काही प्रवासी युपीआय पेमेंट करत नसल्याचे सांगण्यात आले.
तिकीटाची रक्कम अदा करण्यासाठी प्रवाशांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पेमेंट अॅपचा वापर करता येणार आहे. त्यानुसार फोन पे, गुगल पे, पेटीएम यासारख्या सर्व युपीआय अॅपने वाहकाकडे असलेल्या तिकीट मशिनवर असलेल्या क्यूआर कोडद्वारे पैसे आदा करता येणार आहे. एसटीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरू असून याला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.