Ratnagiri Accident : एसटी-दुचाकी धडकेत बसचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल

मांजरेतील अपघातात दुचाकी चालकासह दोघे जखमी
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

देवरूख : संगमेश्वर-आबलोली-जाकादेवी मार्गावरील मांजरे बुडबुड्याचे पाणी येथे एसटी बस आणि ॲक्टिव्‍हा दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकी चालकासह दोघेजण जखमी झाले. हा अपघात २८ ऑगस्ट रोजी दुपारी घडला. याप्रकरणी संगमेश्वर पोलिस ठाण्यात एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नेश अनंत चव्हाण (वय १८, रा. राई रांजेवाडी, ता. रत्नागिरी) हा दुचाकीवर (एमएच ४६ बीजी ८१४९) वडील अनंत तुकाराम चव्हाण (६०) आणि आई रुपाली अनंत चव्हाण (५६) यांना बसवून राई ते काजुर्ली असा प्रवास करीत होता. ते आबलोली ते जाकादेवी मार्गावरील मांजरे बुडबुड्याचे पाणी येथे आले असता, समोरून रत्नागिरी एसटी डेपोची बस (एमएच ४० एन ९८७०) येत होती. या बसचा चालक पुंडलिक शिवाजी केंद्रे (३५, रा. केंद्रेवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर; सध्या रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) याने बस हयगयीने व अविचाराने वेगाने चालवून रस्त्याच्या उजव्या बाजूला येत दुचाकीला धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news