

रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांना मुंबईतून कोकणात घेवून येण्यासाठी तब्बल 200 हुन अधिक बसेस गेल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरी जिल्हाअंतर्गत, जिल्हाबाहेरील प्रवास करणार्या प्रवाशांना, नोकरदारांना मोठा फटका बसला. कित्येकांना तासन्तास वाट पाहावी लागली. काहींना अधिकचे पैसे देवून खासगी गाड्या करून घर गाठावे लागले. मुंबईतून एसटी रत्नागिरी विभागात परतल्या असल्या तरी वेळापत्रक अद्याप कोलमडलेलेच आहे. कोकणात येणार्या चाकरमान्यांना, सामान्य प्रवासी, नोकरदार व्यापार्यांना एसटी वाट पाहावी लागत आहे. नाईलाजास्तव वडाप, खासगी बसद्वारे रत्नागिरीसह अन्य गावात जावे लागत आहे.
गणेशोत्सवानिमित्त लाखो चाकरमानी कोकणात येत असतात. त्यामुळे रत्नागिरी विभागासह अन्य जिल्ह्यातील कित्येक एसटी बसेस मुंबईला गेल्या होत्या. दरम्यान, रत्न्ागिरी विभागातून तब्बल 200 एसटी बसेस रवाना झाल्या होत्या. मात्र 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत एसटी विभागाचे वेळापत्रक कोलमडले आहे.
रत्नागिरी ते लांजा, राजापूर, गुहागर, देवरूख, चिपळूणला जाण्यासाठी एसटी बसेसची तासनतास वाट पहावी लागली.कोल्हापूर, विजापूर ला जाणार्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी पंचाईत झाली होती. जिल्हांतर्गत रत्नागिरीतून लांजा, राजापूर, चिपळूणसह अन्य तालुक्याला जाण्यासाठी एसटी बसेस वेळेत आल्या नव्हत्या.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. दोन तासाला एक बसेस एसटी दाखल होत होत्या. प्रवाशांनी एसटी बसस्थानकात तक्रार केल्यानंतर एसटी बसेस मुंबईला गेल्या असल्यामुळे एसटी कमी आहेत, जे येथील त्यामध्ये बसून प्रवास करा असे सांगण्यात आले. चाकरमानी मुंबईतून कोकणात आल्यानंतर गावी जाण्यासाठी ही वेळेत बस नव्हत्या तासन्तास बसची वाट पाहावी लागली, वडाप, खासगी मिनी बसद्वारे प्रवास केला. एसटी बसेस मुंबईला गेल्यातरी जिल्हाअंतर्गतचा प्रवासाचे वेळापत्रक एसटी विभागाने करणे गरजेचे असल्याचे प्रवाशांनी सांगितले.