Ratnagiri Accident|आंबा घाटात एसटीची उभ्या आयशर टेम्पोला धडक; तिघेजण जखमी

गोवरेवाडी बस थांब्याजवळील घटना
Ratnagiri Accident|
आंबा घाटात एसटीची उभ्या आयशर टेम्पोला धडक
Published on: 
Updated on: 

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील गोवरेवाडी बस थांब्याजवळ उभ्या असलेल्या टेम्पोला एसटीने धडक देऊन झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमारास घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जितेंद्र पाटील (रा. सध्या लांजा) यांच्या ताब्यातील धाराशिव - लांजा गाडी (एमएच १४ एमएच ४८३५) ही गाडी घेऊन जात असताना उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला (एमएच ०७ ए. जे. ६५५८) पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. आयशर टेम्पो पंक्चर झाल्याने तो उभा होता. या अपघातात वाहक रोकडेश्वर तोटेवार (रा. लांजा), फुलाजी बत्तलवाड आणि वैष्णवी बत्तलवाड (रा. लांजा) हे जखमी झाले. अपघाताची खबर ११२ वर कॉल आल्याने साखरपा पोलिसांनी तात्काळ अपघातस्थळी जाऊन जखमींना पोलिस गाडीतून साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून उपचार केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. पोलिस हेडकॉन्स्टेबल नितीन जाधव, पोलिस कॉन्स्टेबल सुजित पाटील, चालक स्वप्नील कांबळे यांनी अपघाताच्‍या ठिकाणाहून जखमींना साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.