Ratnagiri News : कारागृहातील २५ बंद्यांनी पूर्ण केला प्लंबिंग कोर्स

डॉ. विनय नातू यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण : कारागृहात कौशल्य विकास उपक्रम
Ratnagiri News
रत्नागिरी : माजी आमदार विनय नातू यांचे स्वागत करताना मान्यवर.
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : कारागृहातून मुक्त झाल्यानंतर बंद्यांना स्वावलंबीपणे आणि सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी महाराष्ट्र कारागृह विभागाच्या वतीने रत्नागिरी विशेष कारागृहात कौशल्य विकास उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत २५ बंद्यांनी प्लंबिंगचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.

अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक डॉ. सुहास वारके आणि विशेष कारागृह महानिरीक्षक तथा कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. मुकुल माधव फाउंडेशन, पुणे, जन शिक्षण संस्थान, रत्नागिरी आणि आयटीआय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जून २०२६ पासून प्लंबिंग कोर्सचे प्रशिक्षण देण्यात आले. शिक्षाधीन आणि न्यायाधीन अशा एकूण २५ बंद्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताच कारागृहात झाला. जन शिक्षण संस्थानचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला फिनोलेक्स कंपनीचे डीजीएम (एचआर) सुजित जगताप, प्लांट एचआर हेड नंदकिशोर शिंपी, व्यवस्थापक एस. रविंद्रन, सीएसआरचे शामराव निंबाळकर, जन शिक्षण संस्थानच्या संचालक निधी सावंत, अमृता शेट्ये, साहिल शेट्ये आणि आयटीआयचे सेवानिवृत्त प्राचार्य भिकाजी नाटेकर उपस्थित होते. कारागृह अधीक्षक सचिन पाटील यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news