

Ratnagiri Crime
रत्नागिरी : शहरातील शांतीनगर येथे वडिलांनी केलेल्या कर्जाला तसेच बेरोजगारीला कंटाळून मुलाने आईचा सुऱ्याने खून करून स्वतः च्या हाताची नस कापून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (दि. २६) पहाटेच्या सुमारास घडली.
पूजा शशिकांत तेली (वय ४५, रा. शांतीनगर एकता वसाहत, रत्नागिरी) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर तिचा मुलगा अनिकेत तेली (वय २५) याने धारदार सुऱ्याने वार करून खून केला. अनिकेतच्या वडिलांनी त्यांच्या मुंबईला असलेल्या मोठ्या मुलासाठी कर्ज काढले होते. हा कर्जाचा बोजा वाढत गेल्याने त्यांनीही दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. सर्व कर्जदार आपल्या पैशांसाठी वारंवार तगादा लावत असल्यामुळे अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून मंगळवारी पहाटेच्या सुमारास अनिकेतने आपल्या आईच्या गळ्यावर धारदार सुऱ्याने वार करून खून केला. त्यानंतर अनिकेतने स्वतःच्या हाताची नस कापून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.