रत्नागिरी : चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलाय का हे तपासायला छाननी होणार

Yogesh kadam : लाडकी बहीण योजनेबाबत ना. कदमांचा विरोधकांना टोला
Ladki Bahin Yojana
मंत्री योगेश कदमfile photo
Published on
Updated on

खेड : लाडकी बहीण ही योजना गरीब बहिणीसाठी असून जर कोणी फोर व्हीलर असताना या योजनेचा लाभ घेतला असेल तर ते छाननी करून तपासावे लागेल. परंतु त्यामुळे कोणावर अन्याय होणार नाही. त्याचा विचार विरोधकांनी करण्याची गरज नाही, असा टोला गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांनी येथे लगावला.

लाडकी बहीण योजनेच्या छाननी करून विरोधक सरकारवर निशाणा साधत असून त्यांच्या टीकेला आज गृहराज्य मंत्री ना.योगेश कदम यांनी उत्तर दिले आहे.

ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्‍यांमध्ये कोणी फोर व्हीलर गाडी असलेले, शासनाच्या योजनेचा लाभ घेतलेले अशा महिला नाहीत याचा शोध घेण्यासाठी अर्जांची छाननी तर करावी लागेलच. परंतु याचा अर्थ कोणाला या योजनेपासून वंचित ठेवण्याचा विचार सरकार करत आहे असे नाही. योजना खरोखर ज्यांना गरज आहे त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार सक्षम असून विरोधकांनी त्याचा विचार करू नये, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news