

रत्नागिरी : शासनाच्या विविध योजना तळागापर्यंत पोहोचवण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थेतील शेवटचा टप्पा असलेल्या ग्रामपंचायतीमार्फत केला जातो. यामध्ये सरपंच हा महत्त्वाचा दुवा आहे. स्वच्छ व सुजल ग्राम विकासासाठी शासनाने आता ‘सरपंच संवाद’ मोबाईल अॅप विकसित केला आहे. जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींना हा अॅप देण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन हे दोन्ही केंद्र शासनाचे महत्वाकांक्षी कार्यक्रम अहेत. या दोन्ही कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात स्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले जात आहेत. या दोन्ही कार्यक्रमांची विश्वासर्हता जपण्यासाठी सरपंच यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील पाणी व स्वच्छता हा मूलभूत घटक गतिमान व परिणामकारक करण्यासाठी सरपंच संवाद या अॅपच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता संवाद आणि नवीन देवाण घेवाण वाढवणे हा आहे, या मोबाईल अॅपद्वारे सरपंच आपल्या गावातील उत्तम व दर्जेदार काम शेअर करू शकतात. तरी या मोबाईल अॅपचा सर्वांना लाभ घ्यावा, असे आवाहन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी सरपंच यांना केले आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत ‘स्वच्छ व सुजल ग्रामसाठी नेतृत्व’ या कार्यक्रमात ‘सरपंच संवाद’ मोबाइल अॅपचे लोकार्पण दि.22 एप्रिल, 2025 रोजी करण्यात आले आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्या सहकार्याने हे अॅप विकसित करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता, संवाद आणि नवीन उपक्रमांची देवाणघेवाण वाढविणे, हा या अॅपचा उद्देश आहे. या मोबाइल अॅपद्वारे सरपंच आपल्या गावातील उत्तम कामकाज शेअर करू शकतात. देशभरातील इतर गावांमधील यशोगाथा पाहू शकतात. विविध विषयांवरील प्रशिक्षण घेऊ शकतात. बातम्यांची माहिती मिळवू शकतात आणि ऑनलाइन प्रमाणपत्रे मिळवू शकतात.
हे अॅप स्वच्छ भारत (ग्रामीण) आणि जल जीवन मिशन या दोन्ही अभियानांच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदत करणारे प्रभावी डिजिटल साधन आहे. जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी हे अॅप तात्काळ डाऊनलोड करून त्याचा नियमित व योग्य वापर करावा. त्यामुळे गाव स्वच्छ, सुजल व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करू शकेल. ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी हे निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
‘सरपंच संवाद’ अॅप डाऊनलोड करण्यासाठी न्ड्रॉईड मोबाईल वापरकर्ता यांनी (1) अॅन्ड्राईड मोवाईल यापरकर्ता (-ndroid user): https://play.google.com/store/apps/ details? id=com.qci.sarpanchsamvaadhl=enIN pli=1 (2) अॅपल मोबईल वापरकर्ता (IOS users): https://apps.apple.com/in/app/ sarpanch-samvaad/id6452552802 या लिंकचा वापरा करावा, असे आवाहन मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व स्व.) सागर पाटील यांनी केले आहे.