Ratnagiri Drowning Case : वावेत कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू

वावे काजू फाटा येथील घटना
Drowning Case
Drowning Case File Photo
Published on
Updated on

खेड : तालुक्यातील वावे काजू फाटा येथील नदीच्या डोहात पाय घसरून पडल्याने एका 12 वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी घडली. मानसी रामचंद्र कदम (रा. धामणंद रोहीदासवाडी, खेड) असे या मृत मुलीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण खेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मानसी ही 28 एप्रिल रोजी सकाळी आपल्या आईसोबत कपडे धुण्यासाठी वावे काजू फाटा येथील नदीवर गेली होती. आई कपडे धुण्यात मग्न असताना काठावर खेळणाऱ्या मानसीचा अचानक पाय घसरला आणि ती खोल डोहात पडली. मानसी पाण्यात बुडत असल्याचे पाहून तिची आई रिना कदम यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून गावातील लोक धावत नदीवर पोहोचले. ग्रामस्थांनी तातडीने नदीच्या डोहात शोध घेऊन सकाळी 11.30 वाजता मानसीला पाण्याबाहेर काढले.

मानसीला बेशुद्ध अवस्थेत प्रथम वावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला तत्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. या दुर्दैवी घटनेमुळे धामणंद गावावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news