Ratnagiri News |संगमेश्वर तालुक्यातील घरफोडीचा पोलिसांकडून छडा, जावईच निघाला चोर, चोरीचे दागिने बँकेत गहाण ठेवले

चोरी प्रकरणात घरमालकाच्या जावयालाच अटक करण्यात आली आहे
theft
theftPudhari
Published on
Updated on

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक, शिंदेवाडी येथील घरफोडी प्रकरणाचा देवरुख पोलिसांनी यशस्वी छडा लावला असून, या प्रकरणात घरमालकाच्या जावयालाच अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चोरी केलेले सोन्याचे दागिने आरोपीने बँकेत गहाण ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी परिसरातील रहिवासी संतोष दौलत पाल्ये यांच्या घरात २४ जानेवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत चोरीची घटना घडली होती. घरातील बंद कपाटातील एक सोन्याचा हार आणि एक चैन अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. कपाटाचे कुलूप न तोडता अत्यंत शिताफीने ही चोरी करण्यात आली होती.

चोरीचा प्रकार लक्षात येताच संतोष पाल्ये यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना घरातील व्यक्तीवर संशय आला. तांत्रिक विश्लेषण आणि सखोल चौकशीच्या आधारे संतोष पाल्ये यांचा जावई सचिन दत्तात्रय नाखरेकर याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर आले असून, चोरी केलेले दागिने त्याने बँकेत गहाण ठेवल्याची माहितीही उघड झाली आहे.

देवरुख पोलिसांनी आरोपी सचिन नाखरेकर याला अटक केली असून, चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news