Ratnagiri Drowning | काटवली येथे बंधाऱ्यात मासेमारी करताना बुडून ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मासेमारीसाठी गेले असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकला; गावावर शोककळा
Drowning Incident
Drowning Incident Pudhari File Fhoto
Published on: 
Updated on: 

Sangameshwar Drowning Incident

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील काटवली येथे नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात बुडून ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि.२१) घडली. प्रकाश अर्जुन गेल्ये (वय ५४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मासेमारीसाठी गेले असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे काटवली गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश गेल्ये हे बुधवारी नेहमीप्रमाणे नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याजवळ मासेमारीसाठी गेले होते. यावेळी बंधाऱ्यातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. पाण्यातून बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

Drowning Incident
Ratnagiri News : ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ला बळ; श्रमदानातून उभारले ६ हजार ५०१ बंधारे

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शोधमोहीम राबवून प्रकाश गेल्ये यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणाची स्थानिक पोलिसांकडे नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, नदीपात्र, बंधारे आणि खोल पाण्याच्या ठिकाणी मासेमारीसाठी जाताना नागरिकांनी पाण्याच्या खोलीचा अंदाज घ्यावा आणि सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news