

रत्नागिरी : आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने 2026- 2027 या शैक्षणिक वर्षासाठी शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेस मान्यता दिली आहे. त्यासाठी शाळांना नोंदणीसाठी 9 जानेवारीपासून लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शिक्षणाचा मूलभूत अधिकार या कायद्यान्वये राज्य शासनाच्यावतीने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये 25 टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात. या जागांच्या प्रवेशासाठी नवीन शैक्षणिक वर्षात शासनाकडून मान्यता दिली जाते. त्यानुसार 2026-27 साठी आरटीईअंतर्गत 25 टक्के राखीव जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. याअंतर्गत प्रवेशासाठी शाळांची नोंदणी सुरुवातीस करण्यात येणार आहे. यासाठी 9 जानेवारीपासून शाळांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यास लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 2025-2026 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी 90 शाळांनी नोंदणी केली होती.