Ratnagiri Rain : पावसाची ७८ टक्‍क्‍यांपर्यंतच मजल; गतवर्षाच्या तुलनेत ९८३ मिमी तूट

२४ सप्टेंबरअखेर जिल्ह्यात २,६१६ मिमी पाऊस; गतवर्षी याच कालावधीत ३,५९९ मिमी, २२.२३ टक्‍क्‍यांनी तूट
Ratnagiri Rain Updates
Ratnagiri Rain Updates
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण गतवर्षाच्या तुलनेत लक्षणीय घटले आहे. एक जून ते २४ सप्टेंबर २०२६ अखेर जिल्ह्यात सरासरी २,६१६.४४ मिमी पावसाची नोंद झाली असून, वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ७७.७७ टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात सरासरी ३,५९९.६७ मिमी म्हणजेच वार्षिक सरासरीच्या १०७ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा गतवर्षाच्या तुलनेत तब्बल ९८३ मिमी पाऊस कमी झाला आहे.

दरम्‍यान जिल्ह्याची वार्षिक सरासरी ३,३६४.२२ मिमी आहे. त्याच्या तुलनेत यंदा आतापर्यंत ७४७.७८ मिमी पावसाची तूट आहे. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत अजूनही पावसाचे प्रमाण सुमारे २२.२३ टक्क्यांनी कमी आहे.

रत्‍नागिरी जिल्‍ह्यात मागील वर्षी मे महिन्‍यातच पावसाने दमदार हजेरी लावली होती. कोकणाच्‍या इतिहासात सर्वाधिक पाऊस मे महिन्‍यात झाला होता. त्‍यानंतर जून, जुलै या दोन महिन्‍यात पावसाने जिल्‍ह्याला झोडपून काढले होते. सप्‍टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये तीन तालुक्‍यात पूरपरिस्‍थित होती. त्‍यामुळे जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. कोट्यवधीचे नुकसान झाले होते. ४ हजारहून अधिक मिमी पाऊस जिल्‍ह्यात झाला होता. मात्र यंदाच्‍या वर्षी मान्‍सून वेळेवर आला मात्र काहीच दिवस चांगला पाऊस झाला. जुलै महिन्‍यात सर्वाधिक पाऊस झाला असून एका आठवड्यात जून महिन्‍याचा बॅकलॉक भरून काढले. त्‍यानंतर ऑगस्‍ट, सप्‍टेंबर महिन्‍यात पावसाने मोठी निराशा केली आहे. एकंदरीत पाच वर्षाची पावसाची आकडेवारी पाहता २०२५ या वर्षी सर्वाधिक पाऊस झाला होता. २०२३ नंतर २०२६ यावर्षी पाऊस कमी झाला असल्‍याचे सांगण्यात आले.

पिके करपू लागली

जिल्‍ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्‍यामुळे भात, नाचणी पिके चांगली आली आहेत. मात्र ऑगस्‍ट, सप्‍टेंबरमध्ये पावसाने हुलकावणी दिल्‍यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पिके पिवळी पडून करपू लागली आहेत. दाणे भरण्याच्‍या काळात शेतात पाणी नाही. त्‍यामुळे यंदा भात पिकाचे उत्‍पादन घटण्याची शक्‍यता असल्‍याचे कृषी विभागाच्‍या वतीने सांगण्यात आले.

पाऊस कमी मात्र पाणी टंचाई दूर

उन्हाळ्यात जिल्‍ह्यावर भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला. १८ हून अधिक टँकर वाडी, वस्‍ती, गावात सुरू होते. जून, जुलै महिन्‍यात झालेल्‍या पावसामुळे जिल्‍ह्यावरील पाणी संकट दूर झाले आहे. नद्या, धरणातील पाणी पातळी वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news