Ratnagiri News : क्‍यूआरद्वारे खत विक्रीत रत्‍नागिरी राज्‍यात तळाला!

५ महिन्‍यांत फक्‍त ३१४ विक्री नोंदी; आजअखेर ४३ मेट्रिक टन खताची विक्री
Fertilizer Sales
Fertilizer Sales
Published on: 
Updated on: 

जाकीरहुसेन पिरजादे

रत्‍नागिरी : राज्‍य शासनाच्‍या क्‍यूआर कोडआधारित खत विक्री योजनेत रत्‍नागिरी जिल्‍ह्याची कामगिरी अत्‍यंत निराशाजनक राहिली आहे. ५ जून ते २६ ऑक्‍टोबरच्‍या कालावधीत म्‍हणजेच पाच महिन्‍यांत आजअखेर जिल्‍ह्यात १ हजार २९९ खत बुकिंगची नोंद झाली. त्‍यापैकी प्रत्‍यक्षात फक्‍त ३१४ शेतकऱ्यांना खत विक्री झाली आहे. बुकिंगच्‍या तुलनेत प्रत्‍यक्ष विक्रीचे प्रमाणे अवघे २४ टक्‍के असून, राज्‍याच्‍या ७८.६२ टक्‍के सरारीच्‍या तुलनेत जिल्‍ह्याची कामगिरी खूपच कमी आहे. क्‍यूआरआधारित खत विक्रीत रत्‍नागिरी राज्‍यात तळाला गेला असल्‍याचे आकडेवारीवरून स्‍पष्ट होते.

खत खरेदीसाठी दुकानासमोर लागणाऱ्या रांगा, होणारी धावपळ कमी करण्यासाठी शासनाच्‍या वतीने घरबसल्‍या एफएफएस ॲपद्वारे क्‍यूआर कोड दाखवून खत विक्रेत्‍याकडून खत घेण्याचा निर्णय घेतला. कोल्‍हापूर, छत्रपती संभाजीनगर, रत्‍नागिरीसह इतर जिल्‍ह्यांत सुरुवात झाली. रत्‍नागिरी जिल्‍ह्यात पाच महिन्‍यांच्‍या कालावधीत ११५ मेट्रिक टन खताचे बुकिंग झाले, तर प्रत्‍यक्ष विक्री ४३ मेट्रिक टन खताची झाली. विशेष म्‍हणजे, २६ ऑक्‍टोबर रोजी दिवसभरात केवळ १० बुकिंगची नोंद झाली. त्‍यापैकी ५ शेतकऱ्यांनाच खत विक्री झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news