

रत्नागिरी : बँकेच्या शाखाधिकाऱ्यानेच बँकेचा विश्वासघात करत 39 बनावट कर्जप्रकरणे तयार करून बँकेची तब्बल 2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फसवणुकीची ही घटना 1 एप्रिल 2023 ते 31 जुलै 2024 या मुदतीत घडली आहे.
संतोष शरद नारकर राजापूर अर्बन को.ऑप. बँक शाखा रत्नागिरी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या माजी शाखाधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात शेखरकुमार उत्तम अहिरे (58, रा. रॉयल रेसिडेन्सी, राजापूर) यांनी गुरुवार 15 जानेवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित संतोष नारकर हा रत्नागिरी येथील राजापूर अर्बन को-ऑप. बँकेच्या शाखेमध्ये शाखाधिकारी पदारवर कार्यरत होता. त्यावेळी त्याने बँकेचा विश्वासघात करुन 39 बनावट कर्जप्रकरणे तयार करुन स्वतःच्या पदाचा गैरवापर करुन बँकेतून एकूण 1 कोटी 98 लाख 69 हजार 673 रुपयांचे कर्ज मंजूर करुन घेतले. हे कर्ज त्याने स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर करून बँकेची फसवणूक केली. याप्रकरणी संशयित शाखाधिकाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 316 (2), 316 (5), 318 (4), 336 (2), 338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.