

राजापूर : राजापूर तालुक्यातील कशेळी येथे घराला आग लागल्याने घर बेचिराख झाल्याची घटना घडली असून ही घटना शुक्रवारी रात्री घडली. यामध्ये घर पूर्णतः जळून खाक झाले आहे. सुमारे 8 लाख रू. नुकसान झाले आहे. घरामध्ये चार व्यक्ती होत्या. मात्र सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही.
कशेळी येथील हरिश्चंद्र मारूती फोडकर, तुषार फोडकर याच्या राहत्या घराला शुक्रवारी मध्यरात्री सुमारे तीन वाजता आग लागली. सद्या त्या घरामध्ये चार व्यक्ती राहत असून उष्णतेचे चटके लागू लागल्याने त्यांच्या लक्षात आले घराला आग लागली आहे. ते त्वरीत घरापासून दूर गेले असल्याने मोठा अनर्थ टळला. यामुळे त्या चौघानाही कोणतीही दुखापत झाली नाही. यावेळी येथील ग्रामस्थांनी जळीत घराकडे धाव घेतली मात्र आग एवढी मोठी होती की ती आटोक्यात आली नाही. यामुळे घर पुर्णतः बेचिराख झाले. या घराचे सुमारे आठ लाख रूपये नुकसान झाले आहे.
याबाबतचे वृत्त कळताच शिंदेसेनेचे तालुका प्रमुख दीपक नागले यांनी धाव घेत पाहणी केली व पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी सरपंच दि.दि.हळदणकर, तलाठी काजल सगट, पोलीस पाटील सुतार यांच्यासहीत ग्राामस्थ उपस्थित होते आगित सुमारे आठ लाख रूपये नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. ही आग शार्टसर्कीटमुळे लागली असावी असा अंदाज ग्रामस्थांमधून वर्तवण्यात येत आहे.