

रत्नागिरी : मागील दोन महिन्यापासून रत्नागिरी शहर, जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, आता मागील तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून दररोज सूर्यनारायणाचे दर्शन होत आहे. पाऊस नसल्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य झाले असून वाहनधारकांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे वाहनधारकांना तोंडावर रूमाल, मास्क घालून प्रवास करावा लागत आहे. धुळीमुळे डोळे दुखणे, सर्दी, खोकल्याने ही डोके वर काढले असून नागरिकांना दवाखान्याचे खेपा मारावे लागत आहे.
रत्नागिरी शहर जिल्ह्यात पाऊस धो धो पडला. त्यामुळे शेतकर्याबरोबर नागरिक ही आनंदात आहेत. जून, जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यात भात, नाचणी पिकांची लावणी ही झाली. दरम्यान, दुसरीकडे मागील तीन दिवसांपासून पावसाने उसंती घेतली आहे. सकाळपासून दुपारपर्यंत सूर्यनारायणाचे दर्शन होत आहे. पाऊस कमी झाल्यामुळे रस्त्यावरील धूळ वाढत असल्यामुळे मोठ मोठ्या वाहनामुळे धूळ उडत असल्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे कित्येक ठिकाणी धूळ उडत आहे. ही धूळ डोळ्यामध्ये, तोंडात धूळ जात आहे. त्यामुळे वाहनधारक डोळ्यावर गॉगल, चेहर्यावर रूमाल घालून घराबाहेर पडत आहेत. असे असले तरी सर्दी, खोकला व डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण वाढत आहेत.
मागील दोन महिन्यांपासून पाऊस पडत असल्यामुळे धुळीची समस्या जाणवत नव्हती मात्र आता पाऊस थांबल्यामुळे पुन्हा धुळीने डोकेवर काढले आहे. शहरातील अपूर्ण रस्त्यांचे कामे लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. धुळीमुळे डोळ्यांचे आजार, सर्दी, खोकल्याचे आजार वाढत आहेत.
राहुल पाटील,
नागरिक