रत्नागिरी : हवामान खात्याने रत्नागिरीत शनिवारपर्यंत रेड, तर पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात 30 ते 40 कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
शुक्रवारी रत्नागिरीत सकाळी विश्रांती घेणार्या पावसाने सायंकाळी मात्र दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनीही वेग घेतला आहे. शुक्रवारी मध्यरात्री रत्नागिरीत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. दुपारनंतर पावसाचे जोरदार आगमन झाली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाचे दमदार आगमन झाले आहे. काही भागाला पावसाने झोडपून काढले. शनिवारीही हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असून, रविवार व सोमवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केलेले आहे.