Ratnagiri News : रत्‍नागिरी स्‍थानकातील गाळे बचत गटांंना देणार

परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा; तातडीने अंमलबजावणीचे आदेश
Ratnagiri News
मंत्री सरनाईक
Published on
Updated on

रत्‍नागिरी : बसस्थानकातील रिक्त असलेले व्यापारी गाळे आता स्थानिक महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी देण्याचे नियोजन करण्यात आले असल्‍याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. सरकारच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असून सुशिक्षित तरुणांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. या नियोजनाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ना. सरनाईक यांनी रविवारी सकाळी ११ वाजता रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला अचानक भेट देऊन तेथील विविध सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. नवीन बसस्‍थानक, प्रवाशांची बसण्याची व्‍यवस्‍था, पाण्याची व्‍यवस्‍था, सीसीटीव्‍ही, शौचालय, कंट्रोल रूम, हिरकणी कक्ष, पोलिस चौकी, आराम निवास यासह विविध बाबींची पाहणी केली. प्रवाशांना मिळणाऱ्या सेवांची माहिती घेतली तसेच प्रशासनाला आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news