Ratnagiri news | कोंडुरा तिठ्यावर गोवा मद्याचे १९ बॉक्स जप्त; एक ताब्यात

या कारवाईत मद्यसाठ्यासह वाहन असा एकूण ५ लाख १५ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
Ratnagiri news | कोंडुरा तिठ्यावर गोवा मद्याचे १९ बॉक्स जप्त; एक ताब्यात
Published on
Updated on

कुडाळ : सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा-मळेवाड रस्त्यावरील कोंडुरा तिठ्यावर शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत गोवा बनाव मद्याची अवैध वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत एकूण १९ बॉक्स मद्य जप्त करण्यात आले. या कारवाईत मद्यसाठ्यासह वाहन असा एकूण ५ लाख १५ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाकडून देण्यात आली.

१० एप्रिल रोजी कुडाळचे दुय्यम निरीक्षक यु. एस. थोरात यांना खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोन पंचांसह सातार्डा-मळेवाड रस्त्यावर, कोंडुरा तिठा येथे सापळा रचला. दरम्यान, संशयास्पद हालचाल दिसून आल्याने मारुती सुझुकी कंपनीचे पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट वाहन थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनात लपवून ठेवलेले गोवा मद्याचे एकूण १९ बॉक्स आढळून आले. या कारवाईत मद्यसाठ्यासह वाहन असा एकूण ५ लाख १५ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संशयित प्रतिक प्रशांत वेंगुर्लेकर (३५, रा. आंदुर्ले, ता. कुडाळ) याला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम. एस. गरूड, दुय्यम निरीक्षक यु. एस. थोरात तसेच त्यांच्या पथकाने केली. सदर कारवाईमध्ये ए. ए. वंजारी - दुय्यम निरीक्षक, एस. एस. चौधरी - सहाय्यक दुय्यम निरीक्षक, एस. एम. कदम - जवान नि. वाहनचालक, एन. पी. राणे - जवान, व्ही. एम. कोळेकर - जवान, पी. ए. खटाटे - जवान व मदतनीस अवधूत सावंत, विजय राऊळ व प्रशांत परब यांनी मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news