Ratnagiri : गुटखा माफियांना पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले

पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाची कामगिरी
Ratnagiri News
गुटखा माफियांना पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले
Published on
Updated on

देवरुख : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने, गुटख्याचा मोठा साठा जप्त केला. यामध्ये तब्बल 3 लाखांचा गुटखा आणि 5 लाखांची गाडी असा एकूण 8 लाखांचा समावेश आहे. देवरुख पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

सोमवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास गस्त घालत असताना दाभोळे येथे कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणारी गाडी संशयास्पदरित्या उभी असल्याचे देवरुख पोलिसांच्या निदर्शनास आले. चौकशीसाठी पोलीस जवळ जाताच चालकाने गाडी वेगात पळवली. क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठलाग सुरू केला आणि हातखंबा ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. संयुक्त कारवाईत हातखंबा येथे गाडी अडवण्यात आली.

झडतीदरम्यान विक्रीसाठी बेकायदेशीर गुटखा आढळून आला. गाडीतील चौघांना ताब्यात घेत गाडी व गुटखा असा एकूण 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी अंमली पदार्थ व बेकायदेशीर वस्तू विरोधी मोहिमेला गती दिली आहे. या द़ृष्टीने तालुक्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. या यशस्वी धाडसी कारवाईबद्दल देवरुख पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news