Police Bharti : रत्नागिरीत 108 जागांसाठी उद्या पोलिस भरती

मैदानी चाचणीसह लेखी परीक्षा होणार; 6 हजार 470 अर्ज
Police recruitment
Police Bhartifile photo
Published on
Updated on

रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा पोलिस भरती 2024-25 अंतर्गत 108 शिपाई आणि चालक शिपाई पदांसाठीची भरती प्रक्रिया शुक्रवार, दि. 13 रोजी सकाळी 5.30 पासून मिरजोळे एमआयडीसी येथील क्रीडा संकुल येथे सुरू होणार आहे. यावेळी प्रथम मैदानी चाचणी होणार असून नंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी एकूण 6 हजार 470 अर्ज रत्नागिरी पोलिस दलाकडे प्राप्त झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये पोलिस शिपाई पदासाठी 1 हजार 27 महिला, चालक पोलिस शिपाई पदासाठी 134 महिलांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत, तर 3 हजार 84 पुरुष पोलिस शिपाई पदासाठी आणि 2 हजार 234 चालक पोलिस शिपाई पदांसाठी हे अर्ज प्राप्त झालेले आहेत. ही पोलिस भरती प्रक्रिया 13 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. या प्रक्रियेसाठी 550 पोलिस अंमलदार व 60 पोलिस अधिकारी तैनात करण्यात आलेले आहेत. भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी उत्तेजक औषधांचा किंवा डमी उमेदवाराचा वापर करू नये. रत्नागिरी पोलिस दलाकडून पारदर्शक आणि सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुनच ही भरती प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिक्षकांनी सांगितले.

उमेदवारांना बोगस दलालांकडून किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींकडून ओळखीचा गैरफायदा घेऊन व अन्य प्रकारचे आमिष दाखवून कोणीही पैशांची मागणी केल्यास उमेदवारांनी रत्नागिरी पोलिस दलाच्या सेतू या व्हॉटॲप चॅटबॉट क्र.9371415612 यावर संपर्क साधावा. तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय अथवा पोलिस उपअधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news