‘रत्नागिरी पॅटर्न’ आता पुण्यातही!

इस्रो-नासाचा उपक्रम पुणे जिल्हा परिषदेत राबवण्याचा निर्णय
Ratnagiri News
रत्नागिरी जिल्हा परिषदpudhari photo
Published on
Updated on

दीपक कुवळेकर

रत्नागिरी : अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी ‘नासा’ (अमेरिका) व इस्रो (भारत) येथे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी नेण्यात येते. हाच ‘रत्नागिरी पॅटर्न’ आता पुणे जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे.

खासगी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा टिकवण्यासाठी सध्या विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात यशही येत आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ करण्याचा पाया रोवणे, अंतराळ संशोधनावर जिज्ञासा निर्माण करणे, वैज्ञानिक द़ृष्टिकोन विकसित करणे, नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, यासाठी अमेरिकेतील नासा व भारतातील इस्रो या संस्थेला गुणवंत विद्यार्थ्यांची भेट घडवण्याचा विशेष उपक्रम तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेने राबवला. यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष निधीची तरतूदसुद्धा केली आहे. चाळणी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची दरवर्षी निवड केली जाते. या उपक्रमाचे राज्यात सर्वत्रच कौतुक झालं होतं. आता पुणे जिल्हा परिषदने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदचे मार्गदर्शन मागवण्यात आले होते. त्यानुसार सध्या पुणे जिल्ह्यात प्राथमिक शाळांमध्ये चाळणी परीक्षा घेण्यात आल्या आहेत. यामुळे यावर्षीही हे विद्यार्थी रत्नागिरीप्रमाणेच इस्रो व नासाला जाणार आहेत. एकंदरीत रत्नागिरीचा पॅटर्न हा पुण्यामध्ये दिसणार आहे.

स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषदच्या शाळांतील मुले अव्वळ ठरली आहेत. आता इस्रो व नासाचा रत्नागिरी पॅटर्न पुण्यात दिसणार आहे.
वैदेही रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news