रत्नागिरी : बेकायदेशीर बंदूक, जिवंत काडतुसांसह एकजण ताब्यात

Illegal firearm: संगमेश्वर-देवरूख मार्गावरील कारवाई
Ratnagiri crime
रत्नागिरी : सिंगल बॅरल बंदुकीसह ताब्यात घेण्यात आलेला संशयित आणि पोलिस कर्मचारी.pudhari photo
Published on
Updated on

रत्नागिरी ः रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संगमेश्वर ते देवरूख जाणार्‍या रस्त्यावरील मौजे ताम्हाणे येथून एकाला सिंगल बॅरल बंदूक आणि 6 जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी 4 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली. संदीप शांताराम देवाळे (वय 48, रा. ताम्हाणे संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे या संशयिताचे नाव आहे.

रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला ताम्हाणे येथे एकाकडे बेकायदेशीर सिंगल बॅरल बंदूक असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार या पथकाने त्याठिकाणी सापळा लावला होता. शनिवारी दुपारी त्यांना संदीप रेवाळे हा आपल्या ताब्यात 1 सिंगल बॅरल बंदूक, 6 जिवंत काडतुसे आणि 3 वापरलेली काडतुसे अशा एकूण 36 हजार 800 रुपयांच्या मुद्देमालासह आढळून आला.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, पोलिस उपनिरीक्षक शेषराव शिंदे, पोलिस हवालदार सुभाष भागणे, बाळू पालकर, प्रवीण खांबे, सत्यजित दरेकर, अतुल कांबळे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news