Ratnagiri Fraud : एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणारा गुजरातचा सराईत भामटा गजाआड

३४ एटीएम कार्ड्स जप्त ;​रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याची धडक कारवाई
ATM card
ATM card Pudhari Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : बँक ऑफ महाराष्ट्रचे नवीन एटीएम कार्ड ॲक्टिव्ह करण्यासाठी आलेल्या एका महिलेला बोलण्यात अडकवून, तिचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून फसवणूक करणाऱ्या गुजरात येथील एका सराईत गुन्हेगाराला अवघ्या काही तासांत अटक करण्यात आली. रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली. ही घटना मंगळवारी (दि.२१) सकाळी ११.३० च्या सुमारास घडली होती.

धीरजकुमार मोहनलाल पांचाळ (वय ४१, रा. सुरत, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून वेगवेगळ्या बँकांची एकूण ३४ एटीएम कार्डे जप्त करण्यात आली आहेत. मंगळवारी तक्रारदार महिला विश्‍वनगर, इंद्रधनु अपार्टमेंट येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये आपले नवीन एटीएम कार्ड ॲक्टिव्ह करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तिथे आधीच उपस्थित असलेल्या आरोपीने "माझे पैसे निघत नाहीत, तुमचे निघतात का पाहूया" असे सांगून महिलेचा विश्‍वास संपादन केला.

​त्यानंतर त्याने हातचलाखी करून महिलेचा मोबाईल हातात घेऊन ओटीपी (OTP) जनरेट केला आणि कार्ड ॲक्टिव्ह करून दिले. मात्र, त्याच वेळी स्वतःजवळील दुसरेच एटीएम कार्ड महिलेला देऊन आणि "सर्व्हर डाऊन असल्याने कार्ड ॲक्टिव्ह होत नाही" असे सांगून तिला तेथून घालवून दिले. काही वेळातच महिलेच्या खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज मोबाईलवर आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तत्काळ रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

​सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आरोपीला अटक

​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तपासाचे आदेश दिले. पथकाने शहरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे मांडवी परिसरात गस्त घालत असताना संशयित आरोपी धीरजकुमार पांचाळ याला ताब्यात घेतले. ​गहन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याच्याकडे तक्रारदार महिलेचे एटीएम कार्ड सापडले. त्यानंतर तो रत्नागिरीत मुक्कामाला असलेल्या ठिकाणाची झडती घेतली असता, त्याच्याकडून विविध बँकांची तब्बल ३४ एटीएम कार्डे जप्त करण्यात आली.

​आरोपीचा गुजरात आणि महाराष्ट्रातील गुन्हेगारी इतिहास

​अटक करण्यात आलेला आरोपी धीरजकुमार मोहनलाल पांचाळ (वय ४१, रा. डी-२१४, सद्गुरु अपार्टमेंट, एसएमसी शाळेजवळ, एल. एच. रोड, वरचा रोड, सुरत, गुजरात) हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात उघड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news