Ratnagiri News : गुहागरातील निरामय रुग्णालय धूळखात

रुग्णालय २५ वर्षांहून अधिक काळ बंद अवस्थेत
Ratnagiri News
गुहागरातील निरामय रुग्णालय धूळखात
Published on: 
Updated on: 

गुहागर शहर : तालुक्यातील रानवी येथील निरामय रुग्णालय २५ वर्षांहून अधिक काळ बंद आहे. पूर्वीच्या दाभोळ वीज प्रकल्पासाठी गुहागर तालुक्यातील अंजनवेल, कातळवाडी, वेलदूर, घरटवाडी व रानवी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. निरामय हॉस्पिटलची पालकमंत्री उदय सामंत यांनी पाहणी करून लवकरच हे रुग्णालय सुरू करण्याबाबत भाष्य केले होते. मात्र, अद्याप रुग्णालयाची इमारत धूळखात आहे.

१९९० च्या दरम्यान एन्‍रॉनच्या माध्यमातून संजिवनी मेडिकल ट्रस्ट या पुण्यातील वैद्यकीय संस्थेकडून चालविण्यात येणारे निरामय हॉस्पिटल त्याकाळी संपूर्ण गुहागर तालुक्यासाठी वरदान ठरले होते. किरकोळ आजारापासून ते वंध्यत्व निवारण, हृदय रोग आणि त्यापुढेही या रूग्णालयामध्ये तातडीने उपचार व्हायचे.

अनेक रुग्णांना या रुग्णालयाने जीवदान दिले आहे, परंतु दाभोळ पॉवर प्रोजेक्ट कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात गेल्यानंतर आणि या कंपनीचे दिवाळे निघाल्यानंतर या कंपनीला पुण्यातील संजिवनी मेडिकल ट्रस्टच्या ठरलेल्या अटी पूर्ण करता आल्या नाहीत. आणि त्यामुळेच अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज असलेले रुग्णालय बंद करण्याची वेळ आली. या रुग्णालयाचा फायदा गुहागरसह दापोली तालुक्यातील रुग्णांना होत होता. एखादा रुग्ण अत्यवस्थ झाला तर त्याला डेरवण, मुंबई, कराड, मिरज अथवा पुणे या ठिकाणी हलवावे लागत होते, पण हे रुग्णालय झाल्यापासून या सगळ्याच गोष्टी याच रुग्णालयात सुरळीत होत होत्या.

त्यामुळे रूग्णांचे वेळीच उपचार झाल्यामुळे प्राण वाचत होते. मात्र रुग्णालय बंद झाल्यामुळे गुहागर तालुका आणि दापोली तालुक्यातील जनतेची गैरसोय होत आहे. परिणामी, निरायम रुग्णालय सुरु व्हावे, अशी अपेक्षा गुहागरसह दापोली तालुक्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.