Ratnagiri news | गरम रासायनिक मातीत पडून महिलेचा मृत्यू

Lote MIDC accident | लोटे एमआयडीसीतील घटना
Death News
Death NewsPudhari
Published on
Updated on

खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक परिसरात घडलेल्या गंभीर घटनेत रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेल्या गरम मातीमुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कंपनीच्या मालकासह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून खेड पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ मार्च रोजी दुपारी सुमारे १२.३० वा.च्या सुमारास लोटे परशुराम एमआयडीसी परिसरातील पुष्कर कंपनीच्या आवारात घडली. याबाबतची फिर्याद ललिता चंद्रकांत सोनवणे (वय ४०, रा. बहादूरशेख नाका, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, मूळ रा. पाचगणी, ता. शिराळा, जि. सांगली) यांनी दिली आहे.

मृत महिला शंकुतला बबन सोनवणे (४८) या फिर्यादीच्या सख्ख्या चुलत सासू असून त्या दोघी कचरा गोळा करण्यासाठी कंपनीच्या आवारात गेल्या होत्या. यावेळी कंपनीतून बाहेर उघड्यावर टाकण्यात आलेल्या केमिकलयुक्त गरम मातीत त्या पडल्या. या घटनेत त्यांच्या अंगावरील साडी व कपडे जळून त्या गंभीर भाजल्या गेल्या.

घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा २२ मार्च रोजी पहाटे ३.३० वाजता मृत्यू झाला. या प्रकरणी पुष्कर कंपनीचे मालक गौतम मखारिया, प्लांट क्रमांक १ चे सेफ्टी मॅनेजर सुधाकर जगताप, एचआर मॅनेजर सचिन मनवाल, कमर्शियल मॅनेजर रवींद्र भुतिया तसेच इतर संबंधित व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे लोटे परशुराम औद्योगिक परिसरातील औद्योगिक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news