

देवगड : खोकल्याचे औषध समजून चुकून तणनाशक प्राशन केल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अनुराधा वसंत शिंदे (वय ६४, रा. शिरगाव शिंदेवाडी, ता. देवगड) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सोमवारी (दि.६) पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराधा शिंदे यांनी रविवारी (दि.५) सायंकाळी ६.३० च्या सुमारास खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन केले होते.त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ देवगड ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे २.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी देवगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ.महेंद्र महाडिक करीत आहेत.