Ratnagiri News : चालक-वाहकाने विद्यार्थिनींना बसमधून दरडावत खाली उतरवले

नाणीज येथील प्रकार; पास असूनही तिकिटासाठी पैशांची मागणी
Ratnagiri News
चालक-वाहकाने विद्यार्थिनींना बसमधून दरडावत खाली उतरवले
Published on
Updated on

रत्‍नागिरी : तालुक्‍यातील नाणीज बस थांब्‍यावर घरी जाण्‍यासाठी एसटी बसमध्‍ये प्रवेश करणार्‍या छोट्या विद्यार्थिनींना पास नाकारत, आधी पैसे भरा असे उर्मटपणे बोलून त्‍यांना दरडावत बसमधून खाली उतरवल्‍याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

नाणीज पंचक्रोशी शिक्षणोत्तेजक मंडळ संचलित नाणीज येथील माध्‍यमिक विद्यामंदिर अँड ज्‍युनिअर कॉलेजमध्‍ये पंचक्रोशीतील खानू, कशेळी, करंजारी, घाटीवळे, देवळे परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेतात. ११ जुलै रोजी दुपारी १ वाजता लांजा आगाराची पाली-घाटीवळे ही बस नाणीज बस थांब्‍याजवळ थांबली असता, त्‍यात शाळेच्‍या चार छोट्या विद्यार्थिनींनी बसमध्‍ये प्रवेश केला. यावेळी या विद्यार्थिंनीना या चालक-वाहकांनी तुम्‍ही शाळेच्‍या स्‍टॉपजवळ का थांबला नाहीत, या स्‍टॉपवर का आलात, अशी विचारणा केली. तसेच, त्‍यांच्‍याकडे प्रवासाचा पास असतानाही, बसच्‍या चालक व वाहकांनी त्‍यांना दरडावत पास असूनही त्‍यांच्‍याकडे तिकिटाच्‍या पैशाची मागणी केली. त्‍यानंतर या विद्यार्थिनींना बसमधून खाली उतरवून बस पुढे नेली. चालक व वाहकाच्‍या या दमदाटीमुळे विद्यार्थिनी घाबरून थांब्‍यावरच रडत राहिल्‍या आणि नंतर घरी गेल्‍या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news