

रत्नागिरी : शिक्षकांच्या समायोजन, पटसंख्याअभावी जिल्ह्यातील ९९ शाळा बंद होणार होत्या. मात्र रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील तब्बल ६१ माध्यमिक शाळा शून्य शिक्षकी होण्यापासून वाचवल्या आहेत. त्याशाळेतील विद्यार्थ्यांना दिला सा मिळाला आहे. पटसंख्ये अभावी जिल्ह्यातील ३४ शाळा या शून्य शिक्षकी झालेल्या आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ न देता दुसऱ्या शाळेत वर्ग करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील १०५ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यास जिल्ह्यातील ९९ शाळा शून्य शिक्षकी होणार होत्या. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी समायोजन प्रक्रिया रद्द केली. मंत्रालयात झालेल्या बैठकीनुसार कोकणातील शाळा वाचवण्यासाठी नियम कडक लावू नये, इतिवृत्तानुसार समायोजन प्रक्रिया, शाळांना २० पटसंख्या अट ठेवण्यात आली होती. त्यानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन नुकतेच झाले. त्यामध्ये जिल्ह्यातील तब्बल ६१ शाळांना फायदा झाला असून त्या शाळा वाचल्या आहेत. तर ३५ शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान हो नये म्हणून त्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यात आले आहे. एकंदरीत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील तब्बल ६१ शाळा शून्य शिक्षकी होण्यापासून वाचल्या आहेत. त्यामुळे जवळच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
या ३५ शाळा झाल्या शून्य शिक्षकी
दापोली २, मंडणगड २, खेड ३, गुहागर २, चिपळूण ८, संगमेश्वर ८, रत्नागिरी ३, राजापूर ५ या ३५ शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत.