

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात वाळव्याचा, अवकाळी आणि मान्सूनचा पाऊस पडूनही पाण्याची दाहकता वाढली आहे. जिल्ह्यातील 64 गावांतील 151 वाड्यात 45 हजार 883 टंचाईग्रस्तांना15 खासगी, तर 3 शासकीय अशा एकूण18 टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. मागील दोन आठवड्यापासून टँकरची संख्या स्थिर आहे मात्र गाव, वाड्यांची व फेऱ्यांची संख्या वाढली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यामुळे नदी, विहिरी, तलाव, धरणे आटत चालली आहे. दुसरीकडे वाळव्याचा, अवकाळी आणि मान्सूनचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे तापमानही वाढत आहे. त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई भासत चालली आहे.ग्रामीण भागातील गावांची संख्या, वाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाड्यांनी तर 151 संख्या पार केली आहे. एकूण 2 हजार 653टँकरच्या फेऱ्या होत आहेत. 45 हजार 883 टंचाईग्रस्तांना पाण्याची झळ पोहोचली असून त्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. ऐन जून महिन्यातही टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे. जिल्ह्यातील लांजा, राजापूर या दोन तालुक्यात अद्याप एकही टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही.