Ganpatipule News : गणपतीपुळेत समुद्र खवळला!

पाण्याचा रंग बदलला, चौपाटीची मोठी धूप; पर्यटकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
Ganpatipule Beach
गणपतीपुळे किनारा
Published on
Updated on

गणपतीपुळे : प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्राने अचानक रौद्ररूप धारण केले आहे. गेल्या काही दिवसांत समुद्राच्या पाण्याचा रंग कमालीचा बदलला असून, प्रचंड वेगाने येणाऱ्या लाटांच्या तडाख्यामुळे चौपाटीच्या भूभागाची मोठ्या प्रमाणावर धूप झाली आहे. सध्या येथील समुद्र चौपाटीचा चेहरामोहराच बदलून गेल्याचे चित्र दिसत असून, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लाटांच्या तडाख्याने चौपाटीची दुरवस्था

सध्या समुद्रात निर्माण झालेल्या उधाणामुळे किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटांचा वेग आणि उंची प्रचंड वाढली आहे. या लाटांच्या सततच्या तडाख्यांमुळे चौपाटीवरील वाळू मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे, ज्यामुळे किनाऱ्याचा भाग खचला आहे. समुद्राचे हे बदललेले रूप पाहता स्थानिक प्रशासनाने आणि जीवरक्षकांनी किनारपट्टीवर विशेष लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

प्रशासनाचे आवाहन गंभीरतेने घेण्याची वेळ

गणपतीपुळे समुद्रात लाटांच्या तडाख्याने गेल्या महिन्याभरापूर्वी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, समुद्राची ही सद्यस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटकांना 'समुद्र स्नानाचा' मोह टाळण्याचे आणि खोल पाण्यात न उतरण्याचे कडक आवाहन केले आहे. निसर्गाचा हा इशारा गांभीर्याने न घेतल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

समुद्रात उतरण्यास सक्त मनाई

पाण्याचा अंदाज येत नसल्याने आणि लाटांचा ओढ जास्त असल्याने समुद्रात उतरणे पूर्णपणे टाळावे. जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन करावे किनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. किनाऱ्यापासून दूर राहा चौपाटीचा भाग खचत असल्याने सुरक्षित अंतरावरूनच समुद्राचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गणपतीपुळे देवस्थान स्थानिक प्रशासन आणि जयगड पोलिस ठाण्याचे कर्मचारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून, पर्यटकांनी स्वतःच्या जीवाची जोखीम न पत्करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पर्यटकांनो, काळजी घ्या!

गणेश दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येणाऱ्या भाविकांनी व पर्यटकांनी पुढील गोष्टींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news