

मंडणगड : बुधवारी (दि. ८ जुलै) दुपारी मंडणगड-मुंबई मार्गावर असलेल्या शेनाळे घाट परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर कोसळलेली भलीमोठी दरड बाजूला करण्याचे काम गुरुवारी दुसर्या दिवशीही युद्धपातळीवर सुरू होते. दरडीच्या दोन्ही बाजूंनी जेसीबी, डंपरच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, कोसळलेल्या दरडीचे प्रमाण खूपच मोठे असल्याने दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत होण्यासाठी किती कालावधी लागेल, हे स्पष्ट होत नाही. हा मार्ग दापोली व मंडणगड या दोन तालुक्यांसाठी मुंबई, पुणे, माणगाव, महाडकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. दरडीच्या घटनेनंतर ही सर्व वाहतूक अन्य मार्गांनी वळवण्यात आली होती. वाहतुकीस पर्याय म्हणून पाट-पन्हळी मार्गे म्हाप्रळ हा पर्यायी रस्ता उपलब्ध आहे.