Ratnagiri News : हर्णे किनाऱ्यावर नर डॉल्फिन मृतावस्थेत

वन विभागाकडून पंचनामा
Dolphin News
Dolphin News
Published on
Updated on

दापोली : दापोली तालुक्यातील हर्णे बायपास समुद्रकिनाऱ्यावर १८ जुलै रोजी सकाळी सुमारे एक ते दीड वर्षांचा नर डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर मृत डॉल्फिनची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.

वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित डॉल्फिन हा भरकटला असावा. भरकटल्यानंतर एखाद्या खडकावर आदळल्याने त्याच्या पोटाजवळ आणि मानेवर गंभीर जखमा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वनरक्षक प्रभू साबणे व वनरक्षक विश्वंभर झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मृत डॉल्फिनची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावली. हर्णे कांदळवन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फहद जमादार, कासवमित्र दुर्गेश जाधव, सुरक्षारक्षक नदीम महाडिक, मुजम्मील काझी, ग्रामपंचायत सदस्य, सना काझी तसेच ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news