Ratnagiri News : लांजातील टपाल कार्यालयात ८.२० लाखांचा अपहार

माजी शाखा पोस्टमास्तरवर पोलिसांत गुन्हा दाखल
Financial Fraud
Financial Work
Published on
Updated on

लांजा : लांजा तालुक्यातील मौजे चेरे येथील शाखा टपाल कार्यालयात ग्राहकांकडून स्वीकारलेली ठेवीची रक्कम खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केल्याप्रकरणी माजी शाखा पोस्ट मास्तराविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील अपहाराची रक्कम तब्बल ८ लाख २० हजार १५२ रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी लांजा टपाल उपविभाग निरीक्षक समीर सूर्यकांत बेळेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयप्रकाश यशवंत पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयप्रकाश पवार हा मौजे चेरे येथील शाखा टपाल कार्यालयात शाखा पोस्टमास्तर म्हणून कार्यरत असताना २९ जुलै २०१३ ते २७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ग्राहकांकडून बचत खाते व इतर योजनांसाठी स्वीकारलेली रक्कम विभागाच्या नोंदीत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केल्याचा आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news