Ratnagiri Rain update : दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्ग बारा तास ठप्प

शेकडो वाहनांच्या लागल्या होत्या लांबच लांब रांगा!
Ratnagiri Rain update
Ratnagiri Rain update
Published on
Updated on

खेड : मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड तालुक्यातील खवटी येथे सोमवारी सकाळी हॉटेल अनुसया परिसरात कोसळलेली मोठी दरड अखेर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हटविण्यात यंत्रणेला यश आले. तब्बल १२ तास बंद असलेला महामार्ग एका मार्गिकेवरून वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने दोन्ही बाजूंना अडकून पडलेल्या शेकडो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला.

सकाळी झालेल्या भूस्खलनामुळे दगड व मातीचा मोठा ढीग महामार्गावर आल्याने मुंबईकडे जाणारी तसेच मुंबईहून कोकणात येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. संततधार पावसामुळे दरड हटविण्याच्या कामात अडथळे निर्माण होत असतानाही प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर काम सुरू ठेवले. अतिरिक्त जेसीबी व डंपर घटनास्थळी दाखल केल्यानंतर दुपारपर्यंत दरड हटविण्यात यश आले आणि एका मार्गिकेवरून वाहतूक सुरू करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news