

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाने ब्रेक घेतल्यानंतर वातावरणात बदल होत आहे. दिवसा कडक उन्ह तर सायंकाळी गरज, पहाटे थंडी होत आहे. सततच्या वातावरण बदलामुळे साथीच्या रोगांच्ो प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, घशात खवखव यासह विविध साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे.
साथीच्या आजारामुळे जिल्हा रुग्णालये, शासकीय, खासगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी वाढत आहे. नागरिकांनी आरोग्याचे काळजी घ्यावी असेही आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळा ऋतुत पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात वातारणात सतत बदल होत गेले. त्यामुळे साथींच्या आजारांचे प्रमाण वाढतच आहेत. अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर दुसरीकडे अवकाळी पाऊस, उन्ह, वारा, थंडी, गरम असे वातावरणात बदल होत गेले. आता पाऊस थांबला मात्र वातावरणात बदल होत गेल्यामुळे साथीचे आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, घशातील खवखव, डेंग्यू, मलेरिया यासारखे आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सिव्हील रूग्णालयातील ओपीडी हाऊसफुल्ल झाली आहे. तसेच खासगी दवाखान्यात गर्दी वाढत आहे. लहान मुलात ताप, सर्दी, खोकल्याचे प्रमाण अधिक आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असेही आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.