Ratnagiri Fire : विश्‍वनगरमध्‍ये आगीत घर बेचिराख

नगरपरिषद कर्मचारी वसाहतीसमोरील घटना
Ratnagiri Fire
विश्‍वनगरमध्‍ये आगीत घर बेचिराख
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : शहरातील विश्वनगर परिसरातील नगरपरिषद कर्मचारी वसाहतीसमोर असलेल्या सुनीता सुवरे यांच्या घराला आज सायंकाळी अचानक भीषण आग लागली. देवघरातील तेवत्या दिव्यामुळे लागलेल्या या आगीत घरातील साहित्याचे सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आणि स्थानिक तरुणांनी तत्काळ धाव घेत शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.

सायंकाळच्या सुमारास देवघरातील दिव्यामुळे घरात अचानक आगीने पेट घेतला आणि काही क्षणांतच तिने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचा अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. यावेळी स्थानिक तरुण प्रवीण वाघेला, घोसाळे, सूरज पवार, संकेत कांबळे, नरेश मोहिते आणि स्वरूप जाधव यांनी अग्निशमन जवानांच्या खांद्याला खांदा लावून मदत केल्याने आग विझवण्यात यश आले; सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुवरे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

स्‍थानिक नगरसेविका श्रध्‍दा हळदणकर, संजय हळदणकर यांच्‍यासह अनेकजण मदतीला धावले. हळदणकर कुटुंबियांनी दहा हजार रुपयांची तातडीची मदतही सुवरे कुटुंबाला केली. पतीच्‍या निधनानंतर सुनिता सुवरे या घरात एकट्याच रहात होत्‍या. परिसरातील घरांमध्‍ये घरकाम करुन त्‍या आपला चरितार्थ चालवत आहेत. सायंकाळी त्‍या कामासाठी गेल्‍या असतानाच ही दुर्घटना घडली. या घटनेची नोंद शहर पोलिस स्‍थानकात करण्‍यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.