Ratnagiri News : सोनवडे-कोसुंब घाट मार्गावर गव्‍यांच्‍या कळपाचा ‘रास्‍ता रोको’

गवे थेट मुख्य रस्त्यावर आल्याने भीती
Ratnagiri News
सोनवडे-कोसुंब घाट मार्गावर गव्‍यांच्‍या कळपाचा ‘रास्‍ता रोको’
Published on
Updated on

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील डोंगराळ आणि ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून आता गव्यांचे कळप थेट मुख्य रस्त्यांवर दिसू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनवडे- कोसुंब घाट मार्गावर बुधवारी सकाळीच तब्बल १० ते १२ गवे रेडे आणि एका पाडसाने मुख्य रस्त्यावर ठाण मांडल्याची घटना समोर आली आहे. यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

मुचरी येथील रहिवासी योगेश सप्रे हे आपल्या स्कूटरने देवरुखच्या आठवडा बाजारासाठी जात असताना कोसुंब बौद्धवाडीनजीकच्या तीव्र वळणावर अचानक त्यांच्यासमोर गव्यांचा मोठा कळप उभा ठाकला. समोर अवाढव्य गवे पाहताच क्षणभर त्यांची घाबरगुंडी उडाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ गाडी थांबवत शांतपणे परिस्थितीचा अंदाज घेतला. विशेष म्हणजे, गव्यांचा कळपही काही वेळ रस्त्यावरच उभा राहून सप्रे यांच्या दिशेने पाहत होता. अत्यंत तणावपूर्ण वातावरणातही योगेश सप्रे यांनी धीर न गमावता सुरक्षित अंतरावरून या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे मोबाईलमध्ये कैद केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news