Ratnagiri Accident : दापोली-खेड मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक; चिमुकली गंभीर

इतर काही प्रवाशांनाही दुखापत
दापोली-खेड मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक
दापोली-खेड मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक
Published on
Updated on

दापोली : दापोली-खेड मार्गावरील नवानगर येथे शनिवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दीड वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली असून इतर काही प्रवाशांनाही दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०४ डीवाय ६८६३ क्रमांकाची कार ओव्हरटेक करत असताना चालकाचा अंदाज चुकला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एमएच १२ केजे १०२७ क्रमांकाच्या कारला समोरासमोर जोरदार धडक बसली. धडकेचा आवाज परिसरात घुमला असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना वाहनातून बाहेर काढले आणि उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यामध्ये दीड वर्षाच्या चिमुकलीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

दरम्यान, अपघातामुळे दापोली-खेड मार्गावरील वाहतूक जवळपास दीड तास ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघाताचे नेमके कारण, जखमींची अधिकृत संख्या आणि अन्य तपशील पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news